पुणे प्राईम न्यूज : ऋतू कोणताही असो फॅशनेबल राहायला सर्वांनाच आवडतं. पावसाळ्यात इतर ऋतूंप्रमाणे लुक करता येत नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. अशा वेळी ट्रेंडी दिसण्यासाठी पेहरावात थोडाफार बदल करायला हवा. पावसाळ्यात पेहरावाची निवड कशी कराल? कोणत्या रंगसंगती असाव्या? यासाठी पावसाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही मान्सून फॅशन टिप्स फॉलो करू शकता.
वेगळे रंग निवडाः पावसाळा हा उत्तम वाइब्स असणारा सीझन आहे. या दिवसात तुम्ही चमकदार रंग निवडू शकता. या ऋतूत पांढरे आणि हलके रंग टाळावेत. कारण फिकट रंगावर पावसाचे डाग दिसतात. त्यामुळे गडद रंग निवडा. तुम्ही न्यूट्रल्ससह गुलाबी, निळसर, केशरी आणि पिवळा यापैकी निवडू शकता.
योग्य फॅब्रिक निवडाः पावसाळ्यात बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत योग्य कपडे निवडले नाहीत तर संसर्ग वाढू शकतो. पावसाळ्यासाठी कॉटन हे सर्वात चांगले आणि सुरक्षित फॅब्रिक आहे. जे सुंदर दिसते. महिलांसाठी सुती कपडे घालण्यासाठी पावसाळा हा उत्तम काळ आहे. जर तुम्ही पार्टीत जात असाल तर तुम्ही कॉटनची साडी नेसू शकता. आपण सुंदर सुती कपडे चांगले स्टाईल करू शकता.
स्कर्ट, प्लाझोचा पर्याय : पावसाळ्यात नवनवीन ट्रेंड पाहायला मिळतात. शॉर्ट, मिडी किंवा प्लेटेड स्कर्ट्स तुम्ही घालू शकता. सध्या प्लाझोमध्ये नवनवीन प्रकार पाहायला मिळतात. तसंच शॉर्ट प्लाझोला तरुणींची पसंती मिळत आहे.
बॅग आणि शूज कसे असावेत? : पावसाळ्यात कपड्यांसोबतच शूज, बॅग, मेकअप आणि अॅक्सेसरीज यांच्याकडे देखील लक्ष द्यायला हवं. या ऋतूत पावसाळी चपलांचा जास्तीत जास्त वापर करा. कॅनव्हास किंवा कापडी शूज पावसाळ्यात खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजूबाजूला ओलावा आणि चिखल असल्यानं जास्त उंच आणि पूर्ण फ्लॅट चपलांचा वापर करू नका.
जॅकेट, कोट किंवा श्रग घाला : तुम्ही फॅशनेबल दिसण्याकरता जॅकेट, कोट आणि श्रग घालू शकतात. यामुळे तुम्ही फॅशनेबल दिसालच. तसेच तुमचे वरचे कपडे भिजले तरी देखील आतले कपडे हे कोरडेच राहणार त्यामुळे जॅकेट किंवा श्रग भिजले तरी तुम्ही बिनधास्त काढून आतील सुक्या कपड्यांचा आनंद नक्कीच घेऊ शकता.