Pune Prime News Desk : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत ताणतणाव, थकवा हा येत असतो. त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. पण काही कारणास्तव हा ताण किंवा थकवा येत असतोच. कोणत्याही अडचणीतून किंवा स्ट्रेसमधून बाहेर पडण्याची एक पद्धत आहे. सर्वातआधी समस्या समजून घ्यावी आणि त्यावर उपायासाठी पर्याय निवडा.
तुम्हाला जर समस्येवर उपाय सापडत नसेल तर तुम्हाला स्वतःला तसे तयार करावे लागेल. स्वतःत बदल करावे लागतील आणि आपली लाईफस्टाईल सुरळीत करावी लागेल. ऑफिस, घर आणि रिलेशनशिपमध्ये प्रत्येकालाच काहीना काही अडचणी येतात. या अडचणी आधी स्ट्रेस, नंतर टेन्शन आणि मग डिप्रेशनचे कारण ठरतात.
तसेच रोजच्या जीवनात लोक स्वतःसाठी वेळ काढणे हळूहळू विसरत चालले आहेत. ना ते योग्य आहार घेतात, ना एक्सरसाईज करतात. या सर्वात जास्त प्रभावित होते ती झोप. झोप पूर्ण न होणे किंवा अनिद्रेमुळे स्ट्रेसचे प्रमाण वेगाने वाढते आणि इथेच वेगवेगळ्या समस्यांचे मूळ आहे.
सकारात्मक विचार बाळगणे गरजेचे आहे. हे सकारात्मक विचार स्ट्रेस दूर करण्याचे औषध आहे. जेव्हा समस्या समोर असेल तेव्हा मनातल्या मनात भीती बाळगू नका. हा विचार करा की, या समस्येतून बाहेर याल तेव्हा तुम्ही किती सशक्त व्हाल. समस्या तुम्हाला मजबूत करत असतात.