लांबसडक, काळेभोर केस असावेत असे महिलांसह पुरुषांदेखील वाटत असते. पण काही उपाय करून देखील अनेकांना फरक जाणवत नाही. तसेच बदलत्या हवामानाचा परिणाम त्वचेवरच नाही तर केसांवरसुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेसोबतच केसांची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.
केस गळतीची समस्या वाढत असल्याने काहीवेळा महिलांना जास्त त्रास जाणवतो. त्यामुळे सतत होणारी केस गळती नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. वर्षानुवर्षे सुरु असलेली केस गळतीची समस्या थांबवण्यासाठी मेथी दाणे आणि कढीपत्ता वापरला जातो.
याशिवाय कांदा आणि खोबऱ्याचे तेल वापरून अनेक समस्यांवर आराम मिळवता येतो. कढीपत्ता, मेथी दाणे वापरून बनवलेले तेल नियमित वापरल्याने केसांसंबंधित अनेक समस्या दूर होतात. केस लांब, घट्ट आणि मजबूत होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हे घरगुती उपाय एकदा करून बघा.