Lifestyle : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. पावसाळ्यात कपडे सुकत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात. तुमचेही कपडे पावसाळ्यात वाळत नसतील तर आम्ही तुम्हाला काही ट्रीक सांगणार आहोत, त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.
कपडे वाळण्यासाठी काहीना काही प्रयत्न केले जातात. त्यात पाणी निथळणे महत्त्वाचे आहे. कारण त्यात पाणी असेल तर कपडे वाळणे अवघड होते. अशावेळी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले असतील तर दोनवेळा ड्राय मोडवर फिरवून घ्यावेत. हाताने धुतले असतील तर वाळत घालण्याआधी उंच जागी ठेवून निथळून घ्या आणि शक्यतो जमेल इतके पिळून, झटकून वाळत घाला. हँगरचा वापर केल्यास फायद्याचे ठरू शकते. कपडे खूप असतात आणि जागा कमी असते, त्यावेळी हँगर वापरता येतील.
याशिवाय, पाऊस असो वा चिखल यामुळे कपडे तर खराब होणे टाळता येत नाही. हवेतील आद्रतेमुळे वाळतही नाहीत. विशेषतः शहरांमध्ये असलेल्या छोट्या जागेमुळे कपडे वाळवायला जास्त अडचण येते. परिणामी, कपड्यांना दुर्गंधी येणे, बुरशी येण्यासारखे प्रकार घडतात, पण हे या ट्रीकचा वापर करून टाळता येऊ शकतं.