पुणे प्राईम न्यूज : अनेकांच्या आवडीचा सण म्हणजे दिवाळीचा सण. दिवाळी जवळ आली की आपल्याला वेध लागतात ते फराळाच्या पदार्थांचे, नवीन कपड्यांचे, घर सजवण्याचे. पण या सगळ्याच्या आधी एक महत्त्वाचे काम असते ते म्हणजे घराच्या साफसफाईचे. त्यासाठी एक संपूर्ण दिवस सुद्धा पुरत नाही. तसेच साफसफाई करायला मेहनत लागते ते वेगळंच. तेव्हा यंदा दिवाळीची साफसफाई करण्यासाठी काही टिप्सचा वापर करुन तुम्ही घराची साफ सफाई झटपट करु शकता.
• घरातील साफसफाई करण्यासाठी व्हॅक्युम क्लिनर, वेगवेगळ्या प्रकारचे सफाईचे ब्रश, कापड, साबण यांची आधीच तयारी करुन ठेवा. जेणेकरुन ऐनवेळी साफसफाईीचे सामान आणण्यासाठी बाजारात जावे लागणार नाही.
• साफसफाईला सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम घरातील न वापरल्या जाणाऱ्या, तुटलेल्या आणि फेकण्याजोगा वस्तू वेगळ्या करा आणि त्यांची योग्यपणे विल्हेवाट लावा.
• दिवाळीची साफसफाई करण्यासाठी सिलिंग फॅन, खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ करा. तसेच भिंतीवर कानाकोपऱ्यातील जाळ्या, धूळ स्वच्छ करा. साफसफाई करताना फरशीवरील धूळ पडते. तेव्हा घराची सर्व साफसफाई पूर्ण झाल्यावर सर्वात शेवटी फरशी पुसून घ्या.
• स्वयंपाकघरातील गॅस शेगडी, मिक्सर, फ्रिज, ओव्हन यांसारख्या गोष्टी आपण किचनमध्ये नियमितपणे वापरत असतो. पण हे सगळे एकदम साफ न करता एक एक करुन साफ करा. योग्य ते नियोजन केले आणि चांगल्या उपकरणांचा वापर केला तर हे सगळे अगदी 10 ते 15 मिनीटांत साफ होते.
• दिवाळीच्या साफसफाईसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचीही मदत घेऊ शकता, यामुळे तुमचे काम लवकर आणि सहज होईल. तसेच, तुम्हाला कोणतीही रजा घेण्याची गरज नाही. येथे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कोणती कामे करून घेता येतील याचेही नियोजन करावे लागेल.
• ऑफिसमधून सुट्टी न मिळाल्यास नियोजनासह दिवाळीची साफसफाई करावी लागणार आहे. तुम्ही रोज संध्याकाळी एक खोली स्वच्छ करण्याचे टार्गेट ठेवले पाहिजे, जेणेकरून संपूर्ण घर आठवडाभरात स्वच्छ करता येईल.