Lifestyle : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण. कारण, याच काळात आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होते. लग्नासाठी मुहूर्त हा एक अविभाज्य असा घटक आहे. काही मुहूर्त पावसाळ्यातही निघू शकतात. त्यामुळे काही गोष्टींची योग्य काळजी घेतल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
पावसाळ्यात बहुतांश मंगल कार्यालय उपलब्ध असतात. त्यामुळे बसण्याची व्यवस्था होऊ शकते. जर याच पावसाची अडचण होत असल्यास यासाठी बिन बॅग सीटिंग उपयुक्त ठरतात. सजावटीसाठी नियोन्स, नकली फुले आणि रिबनचा उपयोग करू शकता. तुम्ही आमंत्रण पत्रिकेपासून ते जेवणापर्यंत मान्सून थीमचा वापर करू शकता.
पावसाळ्यात वर किंवा वधूने तुम्ही फ्रेश रंगांचे कपडे परिधान केल्यास आकर्षक दिसते. यात गुलाबी, लाल, सोनेरी यांसारख्या रंगांचे कपडे उठाव दिसू शकतात. याशिवाय, तुमचा मोबाईल किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठी वॉटरप्रुफ बॅगचा वापर करा. तुमच्या विवाह सोहळ्यास अधिक धमाकेदार बनवण्यासाठी डान्स पार्टीचे नियोजन केल्यास सोहळ्यामध्ये एकप्रकारची रंगत येऊ शकते.