LifeStyle : जसजसं वय वाढत जातं, त्यानुसार कोणत्या ना कोणत्या आजारांना सामोरे जावे लागते. पण या वाढत्या वयाची चिंता न करता काही गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यात व्यायाम ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. शारीरिक हालचालींमुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते. त्याचसोबत मधुमेह, रक्तदाब, मेद आणि रक्तातील चरबीचं प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे व्यायामाला प्राधान्य द्यावं.
व्यायामात सातत्य ठेवण्यासाठी काही विशिष्ट व्यायाम प्रकाराची निवड करणे आवश्यक आहे, जो तुमच्या व्यक्तिमत्त्व, जीवनशैली आणि आरोग्यासाठी योग्य आहे आणि तो व्यायाम करताना तुम्ही आनंदी असाल. याशिवाय, ज्या गोष्टी तुम्हाला तणावमुक्त करतात, त्यांची एक यादी तयार करा. दररोज अशा गोष्टी करण्याचे ठरवा, ज्या तुम्हाला ताण-तणावापासून दूर आणि शांत ठेवतीलच पण नंतर तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतील. व्यायामातच स्ट्रेंथ ट्रेनिंग फायद्याचे ठरते. यामुळे शरीर बळकट ठेवता येऊ शकते. तसेच श्वसनाचे व्यायाम व प्राणायाम यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते व शरीर आणि मन शांत राहते.
व्यायामात फ्लेक्सिबिलिटी ट्रेनिंग हा व्यायाम शरीर व शरीरातील स्नायू लवचिक ठेवण्यास मदत करतो. यामध्ये योगा व स्ट्रेचिंग व्यायाम प्रकारांचा समावेश होतो. कार्डिओव्हॅस्क्युलर व्यायाम या व्यायामामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण घटते. रक्ताभिसरण प्रक्रियेला चालना मिळते आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते. चालणे, पोहणे आणि सायकलिंगचा यामध्ये समावेश होतो.