LifeStyle : आपली मुलं समाजामध्ये एक आदर्श व्यक्ती ठरावी. चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी त्यांना मिळाव्यात यासाठी अनेक पालकांचा प्रयत्न असतो. मग अशावेळी मुलांना शिस्त लावण्याच्या नावावर अतिरेक केला जातो. त्यामुळे मुले ऐकत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणून काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
जर तुम्ही मुलांकडे जास्त लक्ष देत नसाल तर त्याचा परिणाम मुलांच्या आत्मविश्वासावर होऊ शकतो. मुलांना त्यांच्या भावना त्यांच्या पालकांसोबत शेअर करणे कठीण होते आणि मुलं हट्टी किंवा चिडचिड देखील होऊ शकतो. मुलांची चूक असो वा नसो, तुम्ही सतत ओरडत राहिलात तर मूल चिडचिड होऊ लागते. आई-वडिलांच्या ओरडण्याने मुलाचे मन दुखावते. यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे हे करणं टाळावं.
अनेक वेळा मुलांना शिस्त लावण्यासाठी पालक मुलांशी जास्त कठोरपणे वागतात. असे केल्याने मुलांमध्ये भीती निर्माण होऊ लागते. तुमच्या मुलांवर अपेक्षांचे ओझे कधीही लादू नका. नेहमी प्रथम येण्याचे किंवा इतरांपेक्षा पुढे राहण्याचा आग्रह मुलांसमोर करू नका. कारण अशाने मुलांमध्ये नकारात्मकतेची भावना निर्माण होऊ शकते.