पावसाळ्यात सँडल असो वा शूज कोणते वापरावेत हे समजत नाही. त्यासाठी मित्र-मैत्रिणींसह अनेक ठिकाणांहून माहिती घेतली जाते. तुम्ही देखील पावसाळ्यात कोणते सँडल किंवा शूज वापरावेत याच्या प्रश्नात आहात तर आम्ही तुम्हाला काही पर्यायांची माहिती सांगणार आहोत.
पावसाळ्यात फ्लोटर्स घालणाऱ्यांची संख्या जास्त आहे. क्वचितच अशी कोणतीही व्यक्ती असेल कधीही फ्लोटर्स वापरले नसेल. फ्लोटर्स घालण्यास अत्यंत आरामदायक असतात. तुम्ही फ्लोटर्स वेस्टर्न आणि इंडियन अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर वापरू शकता. फ्लोटर्सचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते बाजारात आणि ऑनलाईन अशा विविध डिझाइन्स आणि रंगांच्या पर्यायांमध्ये सहज उपलब्ध आहेत.
याशिवाय, ऍरिझोना सँडल हा देखील एक उत्तम पर्याय आहे. कारण, यामध्ये पाणी साचत नाही आणि लवकर कोरडेही होतात. पाणी लवकर बाहेर पडेल, अशी त्याची रचना केलेली असते. ज्यामुळे ओलावा आणि पाय घसरण्याचा धोका कमी होतो. तसेच ते हलके आणि आरामदायी असतात. ज्यामुळे त्याचा वापर करून चालताना स्टायलिश लूक येऊ शकतो.
सध्या स्निकर्सचा देखील एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. स्निकर्सच्या माध्यमातून तुमचा लूक स्टायलिश आणि ट्रेंडी दिसू शकता. पावसाळ्यात लोक अनेकदा शूज घालणे बंद करतात, परंतु जर तुम्हाला स्नीकर्स घालणे आवडत असेल तर तुम्ही उंच टाचांचे स्नीकर्स घेऊ शकता.