सध्या थंडी अर्थात हिवाळा ऋतू सुरु आहे. या ऋतूमध्ये केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आपली त्वचा कोरडी होते आणि त्याला अतिरिक्त आर्द्रतेची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या केसांनाही बदलत्या ऋतूंना तोंड देण्यासाठी अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते.
केसांची काळजी घेताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हिवाळ्यात आपले केस अधिक कोरडे होतात. त्यामुळे मॉइश्चरायझिंगसाठी तेल किंवा क्रीमचा वापर करा. तुम्ही कोणती क्रीम वापरता हे महत्त्वाचे नाही तर तुम्हाला थंड हवामानात केसांमध्ये अधिक ओलावा ठेवावा लागणार आहे. तसेच जर तुम्हाला कोरडे केस सामान्य ठेवायचे असतील, तर दर दोन आठवड्यांनी किंवा दर तीन दिवसांनी केसांना डीप कंडिशनिंग करा. याशिवाय केस जास्त गरम पाण्याने धुणे टाळा.
डोक्यावरचे केस टोपीने किंवा इतर काही गोष्टींनी झाकून ठेवा. विशेषतः अत्यंत थंड हवामानात केसांची काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत कोरडी हवा तुमच्या केसांपर्यंत पोहोचणार नाही आणि तुमचे केसही कोरडे होणार नाहीत. याशिवाय, पोषण आणि आतून ओलावा खूप महत्वाचा आहे. त्यासाठी केसांना आतून मॉइश्चरायझ करण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी प्या. या सर्व गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीचे फायद्याचे ठरू शकते.