Lifestyle : पती-पत्नीमधील नाते दृढ करण्यासाठी लग्नाचा सुरुवातीचा काळ हा सर्वात महत्त्वाचा काळ असतो. या काळात, पती असो वा पत्नी दोघांना एकमेकांना समजून घेण्याची आणि जुळवून घेण्याची संधी मिळते. मात्र, यावेळी काही छोट्या चुका नात्यात दुरावा निर्माण करू शकतात. त्यामुळे याकडे नक्की लक्ष द्यावे. अशाने नात्यामध्ये कटुता येण्याची शक्यता कमी असते.
लग्नाच्या सुरुवातीच्या काळात अनेक लोक आपल्या जोडीदारांसोबत ओव्हर पॉझिटिव्ह होतात. तुमच्या जोडीदाराला अतिप्रमाणात संकोच वाटू शकतो. यामुळे हळूहळू नात्यातील दुरावा वाढू शकतो. म्हणून, आपल्या जोडीदाराला स्वातंत्र्य देणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे. लग्नानंतर तुमच्या जोडीदाराची तुलना इतर कोणत्याही नात्याशी किंवा व्यक्तीशी करणे टाळावे. अशा तुलनेने दोघांमध्ये नकारात्मकता निर्माण होऊन जोडीदाराच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. अशा गोष्टींमुळे नाते कमकुवत होऊ शकते, त्यामुळे जोडीदाराचे गुण स्वीकारा.
नात्यात दोन व्यक्तींची मते महत्त्वाची असतात. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपल्या दृष्टिकोनाला जास्त महत्त्व देणे आणि जोडीदाराचे न ऐकणे यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदाराचे ऐकणे आणि त्याचे विचार समजून घेणे हे चांगल्या जोडीदाराचे कर्तव्य आहे. लग्नानंतर अनेक वेळा जोडीदार एकमेकांच्या कुटुंबाची तुलना करू लागतात. या सवयीमुळे नात्यात कटुता येऊ शकते. याकडेही लक्ष द्यावे.