पती-पत्नीचे नाते कधी प्रेमाचे तर कधी वादाचे असू शकते. पण यामध्ये सामंजस्याची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे काही गोष्टी पत्नीसोबत बोलताना काळजी घ्यावी लागते. नाहीतर नात्यात कटुता निर्माण होते.
पतीकडून अनेकदा त्याच्या पत्नीच्या लूकवरून थट्टा केली जाते. मग त्यामध्ये उंची, जाड, पातळ किंवा लहान म्हणतो. हे अनेक महिलांना आवडत नाही. मग ही चेष्टा पतीने केली तरी चालत नाही. जेव्हा पती तिच्या शरीराबद्दल किंवा सौंदर्याबद्दल बोलतो तेव्हा पत्नीचा आत्मविश्वास कमी होतो आणि तिला तुमच्यापासून स्थिर असं वाटत नाही.
स्वयंपाकात आईचे सातत्याने नाव काढल्यास अनेक महिलांना आवडत नसते. जेव्हा पती आपल्या पत्नीच्या स्वयंपाकाच्या कौशल्याची त्याच्या स्वतःच्या आईशी तुलना करतो, तेव्हा कोणत्याही पत्नीला ते आवडत नाही. पत्नी आपल्या नवऱ्यासाठी खूप प्रेमाने जेवण बनवते, पण जेव्हा नवरा अशाप्रकारे बोलतो तेव्हा पत्नीला हे आवडत नाही. त्यामुळे यातून दुरावा निर्माण होऊ शकतो.