आपल्यापैकी अनेकांकडे फ्रीज असेलच. त्याचा घरात वापर हा गरजेचा बनला आहे. उरलेले अन्न, तापवलेले दूध, भाजीपाला यांसारखे पदार्थ या फ्रीजमध्ये आपण ठेवत असतो. पण हा फ्रीज वापरताना काही काळजी घेणे गरजेचे असते. नाहीतर फ्रीजमधून दुर्गंधी येण्याची शक्यता असते.
लिंबू कापून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास येत नाही. तसेच फ्रीजच्या रॅकवर शीट लावून प्रत्येक आठवड्याला फ्रीजची स्वच्छता करावी. कापलेला लसूण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यामुळे फ्रीजमध्ये दुर्गंधी पसरते. फ्रीजमध्ये ठेवताना सर्व खाद्यपदार्थ बंद डब्यात ठेवल्याने दुर्गंधी पसरत नाही. साफ केल्यावर फ्रीजमधून वास येत असेल तर फ्रीज व्हिनेगरने साफ करा. याशिवाय, प्रत्येक रॅकमध्ये सुकी कॉफी ठेवल्यास 2-3 दिवसांत वास दूर होऊ शकतो.
याकडेही द्या लक्ष
फ्रीज वापरताना क्षमतेपेक्षा जास्त वस्तू ठेऊ नये. फ्रीजमध्ये उपलब्ध जागेत जास्तीत-जास्त सामान ठेवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे नाही, पण वस्तू अलगदपणे ठेवता आणि काढता येतील, इतकेच साहित्य त्यात ठेवावे म्हणजेच फ्रीज ओव्हरलोड होत नाही. तसेच याच्या माध्यमातून दुर्गंधीही टाळता येते.