आपण जास्त वर्षे जगावं असं अनेकांना वाटत असतं. पण बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर याचा परिणाम जाणवतो. मात्र, त्याकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. अशा काही गोष्टी आहेत त्याचं सेवन केल्यास तुम्हाला जीवनात आरोग्यदायी परिणाम जाणवू शकतील.
आहारात काही घटकांचा समावेश केल्यास त्याचा फरक तुम्हाला दिसून येऊ शकतो. त्यात फळे खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. फळांमध्ये केळी, सफरचंद, पेरू, कलिंगड यांसारख्या फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. फळांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे फळांचे सेवन सर्वच ऋतूंमध्ये करता येतं. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्याचे काम फळे करतात. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी फळांचे सेवन करावे.
याशिवाय, पालेभाज्या अर्थात हिरव्या भाज्यांचे आपल्या रोजच्या आहारात समावेश केल्यास फायदा होऊ शकतो. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, फायबर, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळून येते. जर तुम्हाला भाज्या खायला आवडत नसतील तर भाज्यांपासून बनवलेले सूप किंवा इतर कोणतेही पदार्थ खाऊ शकता. शरीरातील उच्च रक्तातील साखर, उच्च कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं.