अनेकांना कारमधून प्रवास करताना ‘मोशन सिकनेस’ची समस्या जाणवत असते. या समस्येमुळे प्रवासात अडचण येऊ शकते. पण काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. तुम्ही कारने लांबच्या प्रवासाला जात असाल, तर तुम्हाला उलट्या, मळमळ यांसारखा त्रास जाणवू शकतो.
कारने प्रवास करताना जर तुम्ही या समस्येचा सामना करत असाल किंवा प्रवासादरम्यान अशी परिस्थिती उद्भवली असेल तर सर्वप्रथम स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत बहुतेक लोक चिंताग्रस्त होतात आणि स्थिती बिघडते. गाडीतून प्रवास करताना तुम्हाला मोशन सिकनेस होत असेल तर प्रवासापूर्वी अशी सीट निवडा, जिथे ही समस्या सहज हाताळता येईल. प्रवासादरम्यान अनेक लोक चुकीच्या सीटवर बसतात, त्यामुळे समस्या योग्य वेळी लक्षात येत नाही. प्रवासादरम्यान जेव्हा-जेव्हा अशी कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा आपली सीट बदलून पाहावे.
गाडीतून प्रवास करताना अनेकांना उलट्यांचा त्रास सहन करावा लागतो. अशा स्थितीत तुम्ही गाडीच्या विंडो सीटच्या दिशेने बसावे. यासोबतच तुम्ही कारची विंडो थोडी उघडी ठेवू शकता. या काळात बाहेरून ताजी हवा आल्यास मोशन सिकनेसची समस्या दूर होऊ शकते.