LifeStyle : हल्ली बहुतांश जणांना चष्मा लागल्याचे पाहिला मिळते. हा चष्मा वापरताना काही काळजी घ्यावी लागते. त्यात तुम्ही वापरत असलेला चष्मा साफ करताना मोठी समस्या निर्माण होते. पण अशा काही ट्रिक्स आहेत त्याचा अवलंब केल्यास काचा साफ होऊन स्पष्ट दिसू शकते.
व्हिनेगरचा वापर करून ग्लास क्लीनर तयार करू शकता. त्यासाठी पाव कप पाण्यात पाऊण कप डिस्टिल्ड व्हिनेगर मिसळावे. हे मिश्रण नीट एकत्र करावे. हे मिश्रण चष्म्याच्या काचांवर स्प्रे करून मायक्रोफायबर कापड वापरून काचा स्वच्छ पुसाव्यात. मायक्रोफायबर कापड नसेल सुती कापड वापरले तरी चालू शकेल.
चष्मा स्वच्छ करण्यासाठी डिस्टिल्ड वॉटरही फायदेशीर ठरू शकेल. त्यासाठी व्हिनेगर, डिस्टिल्ड वॉटर आणि रबिंग अल्कोहोल हे समप्रमाणात घेऊन स्प्रे बॉटलमध्ये भरावे. हे मिश्रण चष्म्याच्या काचांवर स्प्रे करून सुती कापडाने किवा मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ पुसावे.
चष्म्याच्या काचा स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलचा वापरही करू शकता. त्यासाठी पाव कप पाण्यात पाऊण कप रबिंग अल्कोहोल आणि डिश वॉश लिक्विडचे थेंब टाकून नीट एकत्र मिक्स करावे. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावे. चष्म्याच्या काचेवर याचे मिश्रण फवारून कापडाने स्वच्छ पुसावे. तुमच्या चष्म्याच्या काचा लगेच चमकू लागतील.