भारतात अनेक रहस्यमय आणि ऐतिहासिक अशी मंदिरे आहेत त्याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. त्यात भावनगरमध्ये कोलियाक हा एक समुद्रकिनार असून, या पवित्र मंदिरात पाच शिवलिंग आहेत. हे स्वयंभू मंदिर असल्याचे म्हटले जाते. अरबी समुद्राजवळ हे मंदिर असल्याने समुद्रात भरती आल्यावर शिवलिंग पाण्याने झाकून जाते. या मंदिराचा इतिहास महाभारत काळापासून जोडले गेले आहे.
कैलास गुंफा मंदिराची रचना अशी एक अद्भूत बाब आहे, जी कुणालाही न पटणारी आहे. एका मोठ्या खडकातून हे मंदिर बनवण्यात आले आहे. पुरातत्ववाद्यांच्या माहितीनुसार, अर्थ जाणून घेण्यासाठी 30 मिलियन संस्कृत नक्षी आतापर्यंत डिकोड करण्यात आलेले नाही. शिवला समर्पित आहे. कैलास मंदिर सर्वात मोठे रॉक-कट मंदिर आहे. 16 व्या शतकात छत्रपती संभाजीनगरच्या एलोरा गुंफामध्ये बनवण्यात आले आहे.
लिंगराज ओडिशातील भुवनेश्वर हे सर्वात मोठे मंदिर आहे. यामध्ये भगवान शिवला समर्पित 54 मीटरचे हे मंदिर आहे. हे मंदिर 1090 ते 1104 दरम्यान निर्माण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गर्भ गृहाच्या आत, लिंगम स्वतः उत्पन्न झाले आहे, म्हणून त्यास स्वयंभू म्हटले जाते.