आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:ला वेळ देणं अनेकांना जमत नाही. पण हेच करणं तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतं. त्यात काहीजण नेहमी कोणत्या ना कोणत्या विचारात असतात. पण हे करणं तुम्ही थांबवलं पाहिजे. काही गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
सतत विचार तुम्ही करत असाल तर ते थांबवताही येऊ शकतं. त्यासाठी सद्यस्थितीत राहण्यासाठी आणि भूतकाळात राहणे किंवा भविष्याबद्दल चिंता कमी करण्यासाठी सजगतेचा सराव करणे आवश्यक आहे. संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी ही फायद्याची ठरू शकते. कारण, नकारात्मक विचार पद्धती ओळखण्यासाठी आणि बदलण्यासाठी या थेरपीचा फायदा होऊ शकतो.
जर तुम्हाला एखादा छंद किंवा व्यायाम यांसारख्या आनंददायक क्रियाकलापांचा अवलंब करावा. त्याने स्वतःचे लक्ष विचलित करता येऊ शकतं. याशिवाय, तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तिसोबतही वेळ घालवू शकता. हे अतिविचार करण्यापासून लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकते.
यातील महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही ते केव्हा करत आहात आणि त्याचा तुमच्यावर कसा नकारात्मक परिणाम होतो याची जाणीव देखील तुम्हाला होणे गरजेचे आहे. नकारात्मक विचारांना आव्हान देऊन सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यावे. तसेच एकटे राहणे टाळावे. कारण, जेव्हा तुम्ही एकटे असतात नेमकं त्याचवेळी जास्त विचार केले जातात. त्यामुळे याकडे देखील विशेष लक्ष द्यावे.