सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे उबदार कपडे वापरण्याला प्राधान्य दिलं जातं. यामध्ये काही लोक जाड ब्लँकेट्स वापरतात. त्या त्यांना खूप आवडतात. जाड ब्लँकेट किंवा रजाई वापरल्याने त्यांना दिवसभराच्या काळजीतून खूप आराम मिळतो आणि लवकर झोपही लागते. असाच काहींचा अनुभव आहे. तुम्हीदेखील या थंडीच्या दिवसांत जाड ब्लँकेट्स वापरत असाल तर ही माहिती जरूर वाचा.
सामान्य ब्लँकेट्सपेक्षा जाड घोंगडी अथवा जाड गोधडी जड असते. ही घोंगडी बनवण्यासाठी गोळ्या, कापूस आणि इतर अनेक वस्तूंचा वापर केला जातो, ज्यामुळे त्याला जडपणा येतो. जेव्हा आपण जड ब्लँकेटने स्वतःला झाकतो तेव्हा आपल्या शरीराला शांत आणि उबदार वातावरण मिळते. या ब्लँकेटमधून आपल्या शरीरावर जास्त दाब पडल्यामुळे आपला मेंदू लव्ह हार्मोन (ऑक्सिटोसिन) सोडण्याचे संकेत देऊ शकतो. अशाप्रकारच्या क्रियेमुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
तुमच्या शरीराच्या वजनाच्या 10 टक्के एवढ्या वजनाची ब्लँकेट वापरली पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीचे वजन 70 किलो असेल, तर अशी व्यक्ती 7 किलोंची ब्लँकेट निवडू शकते. नवजात किंवा लहान मुलांना भारी ब्लँकेट देऊ नये. त्यांना श्वास घेण्यास किंवा उलटण्यास त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना स्लीप एपनिया (झोपेशी संबंधित समस्या) आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच भारी ब्लँकेट वापरावे. याने फायदा होऊ शकतो.