सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे सहसा होत नाही. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. मात्र, याकडे वेळीच लक्ष दिल्यास पुढचा धोका टाळता येऊ शकतो. त्यात काहीजण नाईट शिफ्ट करतात. काही लोक सतत ही शिफ्ट करत असल्याने ती एक सवय होऊन जाते. मात्र, नाईट शिफ्ट केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम जाणवू शकतात.
नाईट शिफ्ट करणे ही आता सामान्य बाब झाली आहे. नाईट शिफ्ट केल्याने शरीराच्या नैसर्गिक चक्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. नैराश्य, चिंता, अमली पदार्थांचे सेवन यासारख्या समस्या रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये दिसून येते.
तसेच ही शिफ्ट करणारे लोकं रात्रीच्या वेळी उशीरा जेवतात. त्यामुळे त्यांची पचनक्रिया बिघडून जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. शरीराची पचनक्रिया व्यवस्थित झाली नाही तर अपचन, सूज येणे, गॅस किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या अनेक समस्या जाणवू लागतात.
याशिवाय, रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर शरीरातील विषाणू झोपेवाटे शरीरातून निघून जातात. कमी आणि अनियमित झोपेचा परिणाम हार्मोनल्सवर होतो. हार्मोनल्सचे संतुलन बिघडल्यानंतर लठ्ठपणा वाढू लागतो. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूची क्रिया मंदावते. त्यामुळे तुम्ही देखील नाईट शिप्ट करत असाल तर या गोष्टी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.