आपल्या देशात अनेक असे पर्यटनस्थळे, ऐतिहासिक ठिकाणं आहेत. त्याची माहिती आपल्याला असणेदेखील गरजेचे आहे. महाराष्ट्रात तर अनेक शिवकालीन ठिकाणं आहेत. गड-किल्ले आहेत त्याची खासियतही अनोखी आहे. दिवेआगरपासून केवळ 16 किलोमीटरवर असलेले दिघी हे नैसर्गिक गाव आणि या गावात असलेली समुद्रावरची जेट्टी म्हणजे फेरीबोटचे पाण्यातले रमणीय स्टेशनच.
समुद्राच्या मध्यभागी असलेला जंजिरा किल्ला एक ऐतिहासिक ठिकाण आहे. जंजिरा हा शब्द जझिरा या अरबी भाषेतून आलेला आहे. याचा अर्थ बेट अथवा समुद्रावरचे बंदर असा आहे. समुद्रावरच्या या खुल्या बेटाजवळ असलेल्या राजपूर या गावाला कोळ्यांची मोठी वस्ती होती. साहजिकच मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. परंतु, त्या काळात समुद्रीचाचे म्हणजे लुटारूंच्या टोळ्या कोळी समाजाला या खुल्या बेटावरून खूप त्रास द्यायचा. जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड भागात आहे. हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दीही सतत होत असते.
जंजिरा किल्ला हा एक अजिंक्य असा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटीश सर्वांनी हा किल्ला जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र, कोणालाही तो जिंकता आला नाही. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला जिंकण्यासाठी याच्यापासून जवळच एक दुसरा किल्लाही उभारायला घेतला, पण त्यांनाही जंजिरा जिंकण्यात यश आलं नाही.