सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेकांना ताणतणाव हा नकळतपणे येत असतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी नियमित व्यायाम करण्यासोबतच मेडिटेशनही काही लोक करतात. हे मेडिटेशन अनेक फायदे देणारं आहे.
मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायामासोबत मेडिटेशनचाही आधार घेण्यात येतो. मेडिटेशन केल्याने मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेडिटेशन नियमित करणे गरजेचे असते. कमी वेळ असेल तर 10 मिनिटे तरी मेडिटेशन करावे. संध्याकाळी कामकाज संपल्यानंतर मेडिटेशन करणेही फायदेशीर आहे. यामुळे मन शांत होते आणि दिवसभराचा ताणही कमी होतो.
सुरूवातीला मेडिटेशन जास्त वेळ करू नये. केवळ 5-10 मिनिटे मेडिटेशन करणे पुरेसे असते. जर तुम्हाला दररोज मेडिटेशन करायची सवय असेल तर 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ मेडिटेशन करणे फायद्याचे ठरेल. तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जी वेळ योग्य वाटेल तुमच्या वेळापत्रकानुसार तुम्ही मेडिटेशन करू शकता.