पुणे प्राईम न्यूज : दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी जवळ आली असून सर्वांची उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या जातात. तुम्हीही तुमच्या प्रियजनांना काही खास भेटवस्तू देण्यासाठी स्वस्त आणि चांगल्या गोष्टी शोधत असाल, तर येथे काही उत्तम पर्याय आहेत.
ड्राय फूट किंवा मिठाई हॅम्पर-
मिठाईशिवाय दिवाळी अपूर्ण आहे . दिव्यांचा सण असण्यासोबतच दिवाळी हा गोड पदार्थांचाही उत्सव आहे. तुम्ही स्वीट बॉक्स किंवा ड्रायफ्रूट बॉक्स आपल्या प्रिय व्यक्तींना देऊ शकता. सुका मेवा हा एक चांगला पर्याय आहे. कारण आपण कधीही खावू शकतो परंतु मिठाई काही दिवसांनी खराब होऊ शकते.
शो-पीस-
मार्केटमध्ये निरनिराळ्या प्रकारचे शो-पीस उपलब्ध आहेत. एक चांगला शो पीस देखील एक उत्तम भेटवस्तू ठरू शकतो. घराच्या सजावटीसाठी तुम्ही चांगली वस्तू खरेदी करू शकता.
चांदीचं नाणं-
चांदीची नाणी आणि भांडी ही दिवाळीसाठी बजेट-अनुकूल भेटवस्तू आहे. दिवाळीच्या काळात चांदीची खरेदी करणं शुभ मानलं जाते.
स्किन केअर किट –
अलीकडच्या काळात स्किन केअर बाबत प्रत्येक व्यक्ती प्रचंड सजग झाली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना स्किन केअर किट देऊ शकता. यामध्ये तुम्ही हिवाळ्याच्या दृष्टीने मॉइश्चरायझरसारखे टोनर, क्रीम असे अनेक प्रॉडक्ट ठेऊ शकता.
पितळी लक्ष्मी गणेश मूर्ती-
दिवाळीच्या पूजेच्या वेळी लोक लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती खरेदी करतात. तुमच्या प्रियजनांना पितळेच्या लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती, बुद्ध मुर्ती किंवा इतर देवतांच्या मूर्ती भेट देवू शकता.
कस्टमाइज गिफ्ट-
तुम्ही तुमच्या आवडीनुसार गिफ्ट कस्टमाइज देखील करू शकता. या गिफ्टबॉक्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू अॅड करू शकता.