पुणे प्राईम न्यूज : सणासुदीचे दिवस हे आयुष्यात उत्साह आणि आनंद घेऊन जाणारे असले तरी या दिवसात खिसा देखील मोठ्या प्रमाणात खाली होण्याची शक्यता असते. खास करुन दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारपेठ आकर्षक वस्तूंनी इतके बहरलेले असते की, खरेदी करण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. अशावेळी स्मार्ट बचत कशी करावी आणि शॉपिंगवरील अतिरिक्त खर्च कसा टाळावा, याबद्दल काही सोप्या टिप्स पाहूयात.
सर्वप्रथम आपल्या खर्चांचा हिशोब ठेवा…
-सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं शॉपिंगसाठीचं बजेट किती आहे ते ठरवा. ‘अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी तुमचं एक व्यावहारिक बजेट निश्चित करा.
आपल्या आवडत्या ब्रँड्सकडे लक्ष ठेवा…
-जास्तकरून ब्रँड्स हे सणावाराच्या वेळी भरघोस सूट देतात. त्यामुळे तुम्हाला या काळात कमी किमतीत चांगल्या वस्तू घेता येतात. तर अनेक ब्रँड्स हे सणवार सोडून इतरवेळी सूट देतात. त्यामुळे तसं बघून तुम्ही शॉपिंग करू शकता.
क्रेडिट कार्डसचा सांभाळून वापर करा…
-हल्ली क्रेडिट कार्ड सर्वांना सहज उपलब्ध आहेत. क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यानंतर ग्राहकाला त्वरित पेमेंट करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे खरेदी करत असताना आपल्या बजेटमध्ये, सांभाळूनच खरेदी करा. अन्यथा तुमचा शॉपिंगवरचा खर्च जास्त होऊ शकतो.
सेलच्या आकर्षणाला बळी पडू नका…
-दिवाळी जवळ आल्यावर अनेक वेबसाईट्सवर आकर्षक ऑफर दिल्या जातात. या ऑफर्सचा फायदा नक्की घ्या. पण फक्त ऑफर सुरू आहे म्हणून मोठ्या प्रमाणात खरेदी करू नका. जर तुम्हाला खरंच गरज असेल तरच खरेदी करा.