LifeStyle : नृत्य करणे अर्थात नाचणे ही एकप्रकारची कला आहे. त्याचे काही ठिकाणी कोर्सेसही घेतले जात आहेत. या नाचण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात मनसोक्त नाचल्यामुळे मनावरचा ताणही कमी होतो. शिवाय मनही सदैव आनंदी राहायला मदत होते. अनेकजण डान्सकडे स्वतःला शोधण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्वात सकारात्मकता येण्यासाठी गांभीर्याने पाहू लागले आहेत. नाचण्याने आत्मविश्वास वाढतोच शिवाय इतरही अनेक फायदे आहेत.
नाचण्याने तुम्हाला निरोगी राहायला तर मदत होतेच शिवाय आत्मविश्वास वाढतो. लक्ष केंद्रित करायला मदत होते. एकाग्रता, टीम म्हणून काम करणे, शिस्त, शरीराची रचना या प्रत्येक गोष्टी सुधारण्यास मदत होते. डान्स शिकताना निसर्गाशी एकरूप होता येते. ज्यामुळे मनही प्रसन्न राहायला मदत होते. तसेच शरीरातील घाम, थकवा या नृत्यामुळे बाहेर पडतो.
याशिवाय, मन प्रसन्न राहायला चांगल्या गाण्यामुळेही मदत होते. त्यामुळे संगीत आणि डान्स यांची सांगड घालून तुम्ही डान्सचे क्षण चांगल्याप्रकारे जगू शकता. संपूर्ण फिटनेस, सहनशक्ती आणि स्नायूंना बळकट करण्याचे काम डान्स करते. नाचण्याने योग्य पद्धतीने रक्ताभिसरण होते. तसेच मांसपेशी मजबूत होतात आणि वजन नियंत्रित राखण्यास मदत होते.