आपलं घर एकदम हटके अन् चांगलं दिसावं यासाठी काहीतरी विशेष अशी सजावट केली जाते. पण जेव्हा घरातील हॉलचा प्रश्न येतो तेव्हा सजावट चांगली असावी असेच वाटते. त्यामुळे तुम्ही जे काही करणार आहात त्याच्या कल्पना तंतोतंत आणि नीटनेटक्या असाव्या. सर्वात सामान्य चूक पडदे लावताना होते. त्यामुळे पडदे लावताना पुरेपुर काळजी घ्यावी.
पडद्यांमुळे घरात एक चांगलाच गेटअप येतो. पडद्याची उंची वाढून खोलीला भव्य स्वरूप प्राप्त होते. तसेच शक्य तेवढे सिलिंगच्याजवळ रॉड लावल्याची खात्री करून घ्या. योग्य मोजमाप करा. पडदे तयार करण्यासाठी घाई करू नका. आपण जिथे पडदे लावू इच्छित असाल तिथल्या खिडकी किंवा दरवाजाचे योग्य माप घेऊन खात्री करा. तसेच, पडद्याच्या रुंदीची खात्री करून ते संरक्षित करणे आवश्यक आहे.
खूप लहान पडदे घेणे टाळाच. कारण हे पडदे खोलीची शोभा कमी करतात. खूप लहान तसेच जमिनीला न लोळणारे असे पडदे निवडा. खोलीच्या रंगाशी मिळते जुळते पडदे निवडण्याचा प्रयत्न करा. सुरकुत्या असणारे पडदे घरातील सदस्यांचा आळशीपणा दर्शवितात, असे म्हटले जाते. त्यामुळे पडदे धुतल्यानंतर त्यांना इस्त्री करण्यास विसरू नका. यामुळे पडद्यांना वेगळ्याच प्रकारची चमक येते. ते दिसायलाही चांगले दिसते.