पुणे प्राईम न्यूज : स्वयंपाक करणे हे रोजच्या दैनंदिन जीवनातील एक भाग आहे. घरातील सर्व व्यक्तींना नेहमी आवडेल असं जेवण बनवण्याची जबाबदारी महिलांवर असते. काही लोक जेवणाच्या सुगंधावर जेवण बनवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक करतात. अनेकांना हॉटेलसारखं रुचकर जेवण घरच्या घरी बनवायची इच्छा होते. चला तर मग घरच्या घरी स्वादिष्ट आणि रुचकर जेवण बनवण्यासाठी काही किचन टिप्स पाहुयात.
जेवणाची चव वाढवण्याची सोप्या किचन टिप्स…
– भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका, यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील.
– जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा. नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल. यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील.
– कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला. साखर कॅरमलाईज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देईल.
– पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही.
– जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका, त्याचा चिकटपणा निघून जाईल.
– झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या.
– पुरीची चव आणखीन सुंदर वाढवण्यासाठी तुम्ही मैद्याच्या पिठामध्ये रवा टाकून पुरी बनवू शकता. यामुळे पुरीची चव वाढेल.
– टोमॅटो सूप बनवण्यासाठी त्यात एक हिरवी मिरची, एक लसणाची पाकळी आणि आल्याचा तुकडा उकळताना घाला. यामुळे सूप स्वादिष्ट होईल.
– ग्रेव्हीसाठी आले-लसूण पेस्ट तयार करताना लसणाचे प्रमाण नेहमी 60 टक्के आणि आले 40 टक्के असावे, कारण पदार्थाची चव अधिक स्वादिष्ट बनते.
– डाळीमध्ये पाणी जास्त असल्यास ते फेकून देऊ नका. भाज्या तसेच सूप इत्यादीमध्ये वापरा.
– हरभरा, छोले किंवा राजमा रात्रभर भिजवायला हरकत नाही. पण रात्री भिजवायला विसरलात तर सकाळी एक ते दीड तास गरम पाण्यात भिजत ठेवा आणि उकळत असताना त्यात 2 सुपा-या घाला.