पुणे : सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढताना दिसत आहे. त्यात घरगुती सिलेंडरचे दरही वाढले आहेत. अशा परिस्थितीत गृहिणींना स्वयंपाक घरात काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जितके शक्य होईल तितके कमी गॅस वापरण्याचा प्रयत्न केला जातो. पण अशा काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
डाळी आणि भात शिजविण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करा. जर अन्न झाकून शिजवले नाही तर अन्न शिजायला वेळ लागतो. त्यामुळे पदार्थ शिजवताना अन्न झाकूनच शिजवा, याने पदार्थ चवदार बनतो. शिवाय गॅसही कमी लागतो. तसेच फ्रीजमधून पदार्थ थेट बाहेर काढून शिजवू नका. दूध, भाजी किंवा फ्रीजमध्ये ठेवलेला कोणताही पदार्थ थेट गॅसवर गरम करायला ठेवू नका. किमान 1 ते 2 तास आधीच पदार्थ बाहेर काढून ठेवा. याने पदार्थ रूम टेम्परेचरवर येईल. याने पदार्थ गरम करायला जास्त वेळ लागणार नाही.
याशिवाय, अन्न शिजविण्यासाठी तुम्ही नॉनस्टिक पॅन वापरा. नॉनस्टिक पॅनमध्ये अन्न लवकर तयार होते. तेलही कमी लागते. त्यामुळे तुमचा गॅसही वाचेल आणि तेलही कमी लागेल. स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर बेस्ट ऑप्शन आहे, कारण प्रेशर कुकरमध्ये लवकर अन्न शिजते आणि गॅसचा वापर कमी होतो.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्लेम कमी ठेवल्यास फायदा होऊ शकतो. काही जणांचा असा समज आहे की, फ्लेम जास्त ठेवल्याने अन्न पदार्थ लवकर शिजतात. पण, अशाने तुमच्या पदार्थांची चव बिघडू शकते. शिवाय गॅसही वाया जातो. त्यामुळे मध्यम फ्लेमवरच अन्नपदार्थ शिजवा.