पुणे : आपलं घर चांगलं असावं असं सर्वांनाच वाटतं असतं. त्यामुळे घरात काय करावं, काय नको हा प्रश्न पडतो. पण जेव्हा आपण घर घेतो तेव्हा कुटुंबातील सर्वांच्या गरजा व सोयीनुसार अंतर्गत रचनेमध्ये बदल करून घराची सजावट केली जाते. मात्र, असे करताना काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
इमारतीमधील कोणत्याही प्रकारच्या आरसीसी बांधकामाबाहेरील मुख्य भिंती तोडणे व धक्का लावणे यांसारखे प्रकार करू नयेत. कारण त्यामुळे इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो व गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. घरातील काम चालू करण्यापूर्वी फ्लोअर प्लॅन काढून करावयाच्या कामांची यादी करावी. तसेच काम सुरू करताना आधी खराब प्लास्टर काढणे, जुन्या टाईल्स, किचन ओटा, नको असलेले फर्निचर या सर्व गोष्टी काढून टाकाव्यात.
बाथरूम, टॉयलेट, वॉशिंग मशीन यासाठी प्लम्बिंगची कामे करून घ्यावीत. सर्व रूममधील कन्सिल्ड वायरिंगची कामे करून घ्यावीत. बाथरूम-टॉयलेटच्या टाईल्स लावण्यापूर्वी वॉटर प्रूफिंगचे काम करून घ्यावे. त्यामध्ये पाणी भरून लिकेज टेस्ट घ्यावी. जेणेकरून खाली राहणाऱ्या फ्लॅटधारकास त्रास होणार नाही. यांसारख्या अनेक गोष्टींची काळजी घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.