जीवन जगताना सकारात्मक दृष्टीकोन अत्यंत महत्त्वाचा असतो. पण अशा काही घटना घडतात त्याने आपोआपच मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होते. असे जरी असले तरी सकारात्मक अर्थात पॉझिटिव्ह राहणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही कसलीही चिंता न करता प्रसन्न राहू शकता. हेच जीवनात योग्य ठरू शकतं.
तुमचा आत्मविश्वस बहुधा तुमच्या आजुबाजूच्या लोकांवरही अवलंबून असतो. त्यामुळे चांगल्या लोकांची संगत करा. असे लोक तुम्हाला प्रोत्साहित करतील व पडत्या काळात तुमची मदतही करतील. मग ते कुटुंबीय असोत, मित्र असोत किंवा सहकारी. दिवसातून काही वेळ स्वतःला द्या. एकांतात तुम्ही स्वतःला चांगले जास्त समजू शकाल, नवीन गोष्टी शिकू शकाल.
तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला समाजात एक मानाचे स्थान मिळवून देतो. त्यामुळे तुमच्या मनावर झालेला आघात कितीही मोठा असला तरी त्यातून बाहेर निघा. त्यासाठी या काही गोष्टी तुम्हाला उपयोगी ठरतील. चेहऱ्यावर प्रसन्नता व हास्य ठेवून दिवसाची सुरुवात करा. तुम्ही आतून तितके कणखर नसाल तरीही तसे दाखवा. सर्वांना मदत करा, इतरांसोबत प्रेमाने वागा. परंतु, कशाचाही अतिरेक करू नका. या गोष्टी लक्षात ठेवल्यास नक्कीच आनंदी बनू शकाल.