कोणतंही नातं असो त्यामध्ये बऱ्याचदा मतभेद हे निर्माण होतातच. पण, कधी एकाने तर कधी दुसऱ्या जोडीदाराने समजून वागल्यास नक्कीच नाते घट्ट होऊ शकतं. वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी एकमेकांवर प्रेम आणि विश्वास असणं खूप गरजेचं आहे. पती-पत्नीच्या नात्यात काही वाद आणि मतभेद होतात आणि त्यामुळेही नातं घट्ट होतं.
वैवाहिक जीवनात अशा काही गोष्टी आहेत त्याकडे विशेष लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्याने नाते आणखीनच घट्ट होऊ शकतं. त्यात अनेकवेळा पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वारंवार भांडणे होतात. पण वाद मिटवण्याऐवजी एक जोडीदार तो दाबण्याचा प्रयत्न करतो. नंतर हीच चूक जोडीदारामधील अंतराचे कारण बनते. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक वेळा पती-पत्नीमध्ये भांडणे होतात. वैवाहिक जीवनात कटुता येण्याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक चणचण. पैशाअभावी घरात भांडणे होऊ लागतात, त्यामुळे नाराजी वाढतच जाते.
कालांतराने पती-पत्नी एकमेकांना गृहीत धरू लागतात. ती सुरुवातीची कळकळ आणि प्रेमाची अभिव्यक्ती हळूहळू कमी होऊ लागते. हा माझा आहे असे त्यांना वाटू लागते. आणि या चुकीच्या विचारामुळे नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. सुखी वैवाहिक जीवनासाठी जोडीदारांमधील संवाद खूप महत्त्वाचा असतो. नातेसंबंधांमध्ये, तुम्ही तुमच्या जोडीदाराचे ऐकणे, त्याच्या भावना समजून घेणे आणि तुमच्या भावना त्याच्यासमोर मांडणे महत्त्वाचे आहे. कोणतीही समस्या एकत्र सोडवा.