पुणे प्राईम न्यूज डेस्क: हिवाळ्यात एसी असो वा फॅन अथवा कूलर या गोष्टींचा वापर अत्यंत कमी प्रमाणात केला जातो. पण, आता हे हिवाळ्याचे दिवस अर्थात थंडी कमी होताना दिसत आहे. तर आता उष्णता जाणवू लागली आहे. त्यामुळे याच उपकरणांचा वापर वाढत आहे. मात्र, एसीचा जास्त वापर झाला नसल्याने त्यावर धूळ साचली असेल तर आम्ही तुम्हाला साफ करण्याची पद्धत आज सांगणार आहोत.
एसी साफ करताना त्याच्यावरचा कव्हर काढा. अनेक वेळा लोक हिवाळ्यात एसीला कव्हर लावतात. पण, आता कव्हर काढा आणि त्यातील धूळ साफ करा. सर्वप्रथम एसीचा पॉवर सप्लाय बंद करा आणि प्लग काढून टाका. एसीचा फिल्टर काढून पाण्याने धुवावा. जर शक्य असल्यास सौम्य डिटर्जंट देखील वापरू शकता. धूळ काढण्यासाठी फिल्टर हलक्या हाताने हलवा किंवा ब्रशने हलक्या हाताने स्वच्छ करा. ड्रेनेज पाईपने स्वच्छ केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
हिवाळ्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा एसी रीस्टार्ट करता, तेव्हा तुम्ही तो नीट स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमचा विजेचा वापर तर कमी होईलच, पण एसी चांगला कूलिंगही देईल. याशिवाय तुमच्या घरातील हवाही स्वच्छ आणि शुद्ध राहील. हिवाळ्यात ते बंद असल्याने एसीमध्ये धूळ आणि घाण साचते. यासोबतच एसीमध्येही बिघाड होऊ शकतो. त्यामुळे योग्यप्रकारे तो साफ करणे गरजेचे बनते.