अनेक महिला, मुली आपण सुंदर यासाठी प्रयत्नात असतात. त्यानुसार, काहीना काही विशेष असं करत असतात. त्यात लिपस्टिक लावणं असो किंवा मेकअप करणं याकडे तासनतास वेळ घालवतात. असे असताना काही महिलांना लिपस्टिक शेड्स नेमकी कशी निवडायची हेच माहिती नसते. त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
लिपस्टिक शेड निवडणे थोडे अवघड असले तरी अशक्य नाही. जर महिलांनी लिपस्टिक निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्या सहजपणे स्वतःसाठी लिपस्टिक निवडू शकतात. गोरी त्वचा असलेल्यांनी त्यांचे नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी मऊ गुलाबी शेड्स निवडावेत. हे करत असताना तुमच्या त्वचेच्या रंगावर कोणताही परिणाम होणार नाही. याकडेही लक्ष द्यावे.
जर तुमचा स्किन टोन गहूवर्णीय असेल तर बेरी, कॅरमेल टोन आणि माउव्ह शेड तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. हे रंग तुमच्या ओठांना नैसर्गिक रंगावर परिणाम न करता आकर्षक असे ठरतात. खूप हलके किंवा पेस्टल शेड टाळा. कारण ते गहूवर्णीय त्वचेवर चांगले दिसणार नाहीत. तसेच जर गडद लाल, मनुका आणि बेरी टोन यांसारख्या ठळक आणि वास्तविक शेड्स जे नैसर्गिक रंग वाढवतात असे काही चांगले पर्याय देऊ शकतात.