पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्यापैकी अनेकांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय असेल. त्यामध्ये कोणी चॉकलेट असो किंवा आईस्क्रीम किंवा कुठलेही गोड पदार्थ रात्री जेवणानंतर खातोच. त्यात मिठाई खाण्याचा आनंद वेगळाच असतो. मात्र, अधूनमधून मिठाई खाण्यात काही नुकसान नाही. पण असे जरी असले तरी तुमची ही सवय अडचणीची ठरू शकते.
आपण जे काही गोड खातो, त्यात भरपूर साखर असते. हीच साखर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. जेव्हा आपण गोड खातो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते. नंतर काही वेळाने ते कमी होते. रात्रीच्या या चढ-उतारामुळे आपली झोप अपूर्ण राहते. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी सकाळी खूप थकवा जाणवतो. याशिवाय रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा तुम्ही मिठाई खातात, तेव्हा स्वतःला दुरुस्त करून सावरण्याऐवजी शरीर ग्लुकोजचे उर्जेमध्ये रूपांतर करत राहते.
रात्री उशिरा मिठाई खाल्ल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते, ज्यामुळे चयापचयवर परिणाम होतो. रात्री मोठ्या प्रमाणात मिठाई खाल्ल्याने वजन वेगाने वाढते. मधुमेहाच्या रुग्णांनी रोज रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्यास त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढतात. रात्री खूप गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. त्यामुळे न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी आणि किडनीशी संबंधित अनेक आरोग्य समस्या वाढू शकतात.
याशिवाय, रोज रात्री मिठाई खाल्ल्याने टाईप-2 मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो. हृदयाशी संबंधित आजार होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे हे गोड खाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो.