सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला अनेकांना जमत नाही. परिणामी, अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यात मधुमेह आणि रक्तदाबाची समस्या अनेकांना उद्भवू शकते. पण, जर तुम्हालाही रक्तदाबाची समस्या जाणवत असेल तर ती काही विशिष्ट आहार पद्धतींचा अवलंब करून नियंत्रित आणता येऊ शकतो.
उच्च रक्तदाबासाठी मसूर आणि बीन्स हे प्रभावी ठरू शकतात. ब्लॅक बीन्स, गरबान्झो बीन्स, किडनी बीन्स आणि विविध प्रकारच्या मसूर फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे समृद्ध असा स्रोत आहे. बीन्स आणि मसूर नियमितपणे खाल्ल्याने तुमच्या उच्च रक्तदाबाची पातळी नियंत्रित होण्यास मदत होऊ शकते. तसेच आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे. फळे, पालेभाज्या, संपूर्ण धान्याचा आहारात समावेश करावा.
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी विविध प्रकारचे धान्य, फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त डेअरी उत्पादने आणि कोलेस्ट्रॉल कमी असलेला आहार घेतल्यास उच्च रक्तदाब 11 मिमी एचजीपर्यंत कमी होऊ शकतो. याशिवाय, उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत असल्यास नियमित व्यायाम देखील प्रभावी उपचार ठरू शकतो.