गॅस शेगडीचा दीर्घकाळ वापर केल्यानंतर बर्नर काळे पडतात. त्यामुळे हे बर्नर पूर्ववत करण्यासाठी काही प्रयत्नही केले जातात. पण अशा काही पद्धती आहेत त्याचा अवलंब केल्यास तुमच्या शेगडीचे काळे पडलेले बर्नर चमकवता येऊ शकतात. त्याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण हे यासाठी उपयुक्त ठरू शकते. ही पेस्ट तयार करण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. आता हे द्रावण एका स्प्रे बॉटलमध्ये ठेवा आणि संपूर्ण बर्नरवर शिंपडा. काही वेळाने बर्नर स्वच्छ कापडाने स्वच्छ करा. व्हिनेगर जंतू मारतो आणि बर्नरला चमकही देतो. तसेच व्हिनेगर आणि बेकिंग सोडा हा देखील प्रभावी ठरू शकतो. गॅस बर्नर साफ करण्यासाठी, प्रथम गॅस बर्नर आणि स्टोव्ह वेगळे करा.
आता एका भांड्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करा. दोन्ही गोष्टी मिसळल्यानंतर फेस तयार होईल. ही पेस्ट बर्नरवर लावा. 15 मिनिटांनंतर स्क्रबर किंवा ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. यामुळे तुमचा स्टोव्ह चमकेल. लिंबू आणि मीठही यावर फायद्याचे ठरू शकते.
बर्नरवरील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मीठ वापरू शकता. यासाठी लिंबाच्या रसामध्ये थोडे मीठ मिसळा. आता हे मिश्रण चुलीवर घासून घ्या, नंतर काही वेळ राहू द्या. 20 मिनिटांनी ओल्या कपड्याने स्वच्छ करा. यामुळे तुमचा गॅसही चमकेल.