Tech Tips : गुगल किड्स अॅप्लिकेशन बद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे, मात्र ते अॅप्लिकेशन खूप उपयुक्त आहे. तुमच्या घरात लहान मुले असतील आणि तुम्ही त्यांना वापरण्यासाठी टॅब्लेट देत असाल, तर हा अहवाल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला गुगलच्या या अनोख्या अॅप, गुगल किड्स स्पेसबद्दल सांगणार आहोत. मुलांची ऑनलाइन प्रायव्हसी लक्षात घेऊन हे अॅप त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी देत आहे.
गुगल किड्स अॅपमध्ये नेमकं आहे?
सगळ्यात पाहिलं आम्ही तुम्हाला सांगतो की हे अॅप फक्त टॅब्लेटसाठीच वापरात येईल, म्हणजेच तुम्ही ते फोनवर वापरू शकत नाही. Google Kids अॅप्लिकेशनमध्ये नवीन आणि मनोरंजक गेम समाविष्ट आहेत, ज्यांच्या मदतीने मुले नवीन गोष्टी शिकू शकतात. या खेळांमुळे मुलांचा मानसिक विकास आणि कौशल्ये सुधारण्यास मदत होते.
विज्ञान, गणित, भूगोल आणि इतर विषयांची माहितीही या अॅपमध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच पाचवीपर्यंतची मुलेही याचा वापर करू शकतात. गुगल किड्स अॅप्लिकेशन अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, ते वापरण्यास सोपे आहे. त्यात अनेक प्रकारची पुस्तकेही आहेत. याशिवाय चित्रेही देण्यात आली आहेत. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना यूट्यूब ऐवजी हे अॅप वापरू दिलं तर बरं होईल.