पुणे प्राईम न्यूज डेस्क: सकारात्मक विचार ठेवल्यास जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतो. असे करत असताना अनेकजण आपली तुलना इतरांशी करण्याचा प्रयत्न करत असतात. पण, तुमचं हे करणं योग्य नसून ते थांबवणं गरजेचे आहे. मात्र, ही तुलना निकोप मनाने केली तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.
कोणतीही व्यक्ती परिपूर्ण अथवा तिच्याकडे सर्वच काही असतं अशीही व्यक्ती पाहिला मिळत नाही. पण आपण स्वतःकडे काय आहे हे पाहण्याऐवजी इतरांशी तुलना करून आपल्याकडे हे नाही, असे म्हणून चिंता करतो. या अशा गोष्टींमुळे नकारात्मकता आपोआपच येते. परिणामी, याचा आरोग्यावरही दुष्परिणाम दिसायला लागतो. त्यामुळे या गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
आनंदी राहण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये समस्या सोडवण्याची मानसिकता, ध्येय साध्य करण्यासाठी वाढलेली प्रेरणा, समविचारी लोकांशी संपर्क साधणे, रोगप्रतिकारक शक्ती सुधारणे आणि चांगले आणि दीर्घायुष्य जगणे यांचा समावेश होतो. त्यामुळे सकारात्मक राहून इतरांशी तुलना करणे टाळले पाहिजे.