पुणे प्राईम न्यूज डेस्क: दागिने म्हटले की स्त्रियांचा आवडता विषय. परंतु, वेळेनुसार दागिन्यांमध्ये बदल घडून येत आहेत. सध्या नवनवीन ट्रेन्ड फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ घालत असतात. अशातच नवनवीन दागिनेही ट्रेन्ड करत असतात. सध्या स्त्रिया ट्रेन्डिंगमध्ये असलेल्या दागिन्यांकडे आकर्षित होताना दिसतात. मग मॅचिंग ड्रेसेसनुसार दागिनेही मॅचिंग केले जातात. पण सध्या कलर्ड ज्वेलरीचा ट्रेन्ड सुरू आहे.
ज्वेलरी डिझाइनर्सही या दागिन्यांच्या वाढत्या मागणीला पाहून नियॉन आणि फ्लोरोसेंट कलर्ड ज्वेलरींवर वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. परंतु, हे दागिने वापरण्याआधी काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. कलर्ड डायमंड स्टोन असलेली डायमंड ज्वेलरी कधीही आणि कोणत्याही निमित्ताने तुम्ही वापरू शकता. कलर्ड ज्वेलरी वापरताना आपल्या ड्रेससोबत ती ज्वेलरी मॅच होत आहे ना? ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. नाहीतर ड्रेसचा रंग वेगळा आणि ज्वेलरीचा वेगळा असेल तर त्यामुळे तुमचा लूक बिघडण्याची शक्यता असते.
जर हलक्या किंवा पेस्टल रंगांच्या ड्रेससोबत तुम्हाला ज्वेलरी वेअर करायची असेल तर मल्टी कलर्ड फ्लोरोसेंट नेक पीस तुमच्यासाठी हटके पर्याय ठरेल. एका रंगाच्या कपड्यांसोबत मल्टी कलर्ड ज्वेलरी वापरता येऊ शकते. तुमच्या ड्रेसिंगवर जर तुम्ही एखादा ज्वेलरी सेट घालणार असाल तर त्यामध्ये एकच पीस हेव्ही असणं गरजेचं आहे. जर तुमच्या गळ्यातील नेक पीस हेव्ही लूक देणारा असेल तर त्यावर हलक्या कलरच्या बांगड्या किंवा रिंग वापरावी.