सध्या हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आता थंड अर्थात नॉर्मल पाण्याऐवजी गरम पाणी वापरण्यावर भर दिला जात आहे. हात असो की चेहरा धुण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी गिझरचा वापर केला जातो. पण हाच गिझर वापरताना काही काळजी घेण्याची गरज असते. त्यामुळे पुढील धोका टाळता येऊ शकतो.
इलेक्ट्रिक गिझरसोबतच एलपीजी गिझरचा वापरही वाढला आहे आणि अशा परिस्थितीत गिझरमुळे होणारे अपघातही समोर येत आहेत. जर गॅस गिझरचा वापर योग्यप्रकारे केला गेला तर तो इलेक्ट्रिक गिझरपेक्षा खूप चांगला आहे. मात्र, त्याची देखभाल देखील आवश्यक आहे, त्याची वेळेवर सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. गॅस गिझरला कधीही लांब पाईप लावू नयेत. तसेच गॅस गिझर आणि सिलिंडरमधील अंतर जास्त नसावे. दीर्घकाळापर्यंत वापर केल्याने पाईप देखील खराब होतात. त्यामुळे पाईप्स वेळोवेळी बदलल्या पाहिजेत.
काही लोक वेळेवर गिझरचा पाईप बदलत नाहीत. त्यामुळे अपघात होतात. गॅस गिझरमध्ये आग लागण्याची शक्यता खूपच कमी असते, कारण गॅस गळती झाल्यास गॅस त्वरित थांबते. नेहमी गॅस गिझरला गॅस पुरवणाऱ्या कंपनीच्या रेग्युलेटरचा वापर करावा आणि फक्त सरकारी आयएसआय पाईप्स वापरावेत. ब्रँडेड गॅस गिझर नेहमी वापरावेत.
तसेच दरवर्षी एक नवीन सेल देखील टाकला पाहिजे. जर गॅस गिझर वापरात नसेल तर त्याचे सेल काढून ठेवावेत आणि नेहमी चांगल्या कंपनीचे सेल लावावेत. ऑक्सिजन येण्या-जाण्यासाठी सुविधा असेल याची खात्री करावी. बाथरूम बंद नसावे याकडेही लक्ष द्यावे.