LifeStyle : कला ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. प्रत्येकाकडे विशेष कला, कौशल्य हे असतेच. या कलेमुळे आपली आपल्याशी ओळख होते. हीच कला आपल्याला स्वतःला विसरायला लावून वेगळ्या विश्वात घेऊन जाते. स्वतःला व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम म्हणजे कलेकडे पाहिले जाते.
कला तुम्हाला आयुष्यातील काळजी, चिंता या गोष्टींपासून दूर ठेऊ शकते. तुम्ही चिंतेत असाल आणि मनावर ताण आला असेल तर कलेनुसार काहीतरी विशेष असे करण्याचे प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीचा खूप राग आला असेल तर तो मनात दाबून ठेवू नका. तो बाहेर काढण्याची काही पद्धतही आहे. त्यात कला फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला अडकून पडल्यासारखे वाटत असेल तर वेटोळे घालणारे वर्तुळ काढा. यामुळे तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळू शकते.
आपले विचार संकलित करायचे असतील तर चौकोण किंवा आयत काढा आणि तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग आला असेल तर सरळ रेषा काढा. यामुळे तुम्हाला शांत वाटू शकते. मनात भावनिक काही असेल तर पारंपरिक पद्धतीची रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा. यामुळे मनातील विचार दूर होण्यास मदत मिळू शकते.