सासू-सूनेचे नातं हे कधी प्रेमाचे तर कधी वादाचे असू शकते. हे चित्र घराघरात पाहिला मिळतं. पण, जर वाद-विवाद होत नसतील तर सूनांना सासूचे टोमणे हमखास ऐकावे लागत असतील. तुम्हाला असे काही अनुभव आले असतील तर आम्ही अशा टिप्स देणार आहोत त्या फॉलो केल्यास नक्कीच फायद्याचे ठरणार आहे.
तुमच्या सासूच्या टोमणेने तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर सासूशी प्रेमाने एकदा बोलून बघा. आदरपूर्वक तुमची बाजू मांडा. अशा गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतो हे तुम्ही कोणत्याही संघर्षाशिवाय सांगू शकता. असे केल्याने सासू काहीही बोलण्यापूर्वी नक्कीच विचार करेल. जर तुमची सासूही तुम्हाला टोमणे मारत असेल तर सर्वप्रथम तुम्ही टोमणे ऐकून शांत राहा आणि प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करा. कधीकधी भावनिक प्रतिक्रियांमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशा परिस्थितीत धीर धरा आणि उत्तर देणे टाळा.
जर तुमची सासू तुम्हाला खूप टोमणे मारत असेल तर सासूशी आदराने बोला. त्यांचे टोमणे वैयक्तिक म्हणून घेऊ नका. परंतु परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. यासोबतच त्यांना योग्य शब्द वापरून नम्रपणे उत्तर द्या, असे केल्यास पुढील वाद टाळता येऊ शकतात.