घरापासून दूर फिरायला गेल्यावर आपल्याला अनेकदा हॉटेलमध्येच रुम घेऊन राहावं लागतं. पण, हे करत असताना काही विशेष काळजी घेणे गरजेचे असते नाहीतर मोठा फटका बसू शकतो. हॉटेलमध्ये गेल्यावर आरसा असो किंवा प्रकाश देणारे बल्ब, कपाट याकडे नीट पाहणे गरजेचे असते. कारण, यामध्ये छुपा कॅमेरा असू शकतो.
हॉटेलमधून तुमच्या काही खासगी क्षणाचे व्हिडिओ अथवा फोटो काढले जाण्याची शक्यता असते. याची काही प्रकरणेही समोर आली आहेत. त्यानंतर अनेक जणांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याची उदाहरणे आहेत. यातून काही जण ब्लॅकमेलिंगसाठी तर काही प्रकरणात असे व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसून येते. तेव्हा सावध होण्याची आवश्यकता निर्माण होते.
हॉटेलच्या रेटिंगकडे द्या लक्ष
तुम्ही ऑनलाईन हॉटेल बुकिंग करत असाल तर हॉटेलचा दर्जा, त्याची प्रसिद्धी आणि इतर बाबतीत ग्राहकांनी काय फिडबॅक आहे ते पाहावे. त्या हॉटेलला किती रेटिंग दिले आहे, त्याचा रिव्ह्यू एकदा चेक करा. चांगल्या कमेंट्स आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणाला चांगले रेटिंग दिले आहे, ते तपासूनच रुम बूक करा.
हॉटेलमधील आरशाकडे द्या कटाक्षाने लक्ष
हॉटेलमध्ये थांबल्यानंतर आरसा नीट तपासा. आरशाच्या मागील बाजूस एखादे गॅझेट, यंत्र लावले तर नाही ना, कॅमेरा लावला आहे का ते तपासा. दरवाज्याच्या छिद्रातून काय काय दिसते. घड्याळ असेल तर ते सुद्धा तपासा. आता कॅमेरे आणि व्हाईल रेकॉर्डिंग डिव्हाईस अनेक ठिकाणी लपवण्यात येते. त्याचा शोध घेण्याचे ॲप आता उपलब्ध आहेत. त्याचाही वापर करता येऊ शकतो.