आपल्यापैकी बहुतांश जण उपवास हे करत असतील. उपवास आरोग्यासाठी चांगला मानला जातो. त्याचे काही फायदेदेखील आहेत. पण काही लोक उपवास करताना खाण्या-पिण्याशी संबंधित काही चुका करतात. ज्यामुळे एकूणच आरोग्याचे नुकसान होते. त्यामुळे त्या चुका टाळण्याचा सल्ला दिला जातो.
उपवास करताना जर तुम्हाला भूक लागत असेल तर तुम्ही पुरेसे पाणी प्या आणि दिवसातून दोन-तीन वेळा हर्बल टी प्या. उपवासात काहीजण दह्याबरोबर मिल्कशेक किंवा फळे खातात. पण प्रत्यक्षात ते आपल्यासाठी हानीकारक मानले जाते. दुग्धजन्य पदार्थांमध्ये फॅट आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. उपवासादरम्यान जास्त साखर खाल्ल्याने अनहेल्दी वजन वाढू शकते. त्याऐवजी नैसर्गिक साखर असलेले पदार्थ खा. गूळ, मध कमी प्रमाणात खाणेही ठीक आहे.
उपवासाच्या काळात चिप्स, पुरी इत्यादी तळलेले पदार्थ खाणे टाळावेत. कारण त्यात फॅटचे प्रमाण जास्त असते. जास्त तळलेले पदार्थ वजन वाढवू शकतात आणि हृदयाच्या आरोग्यास धोका वाढवू शकतात. त्याऐवजी, आपल्या अन्नातील फॅटचे प्रमाण कमी करण्यासाठी शिजवलेले किंवा भाजलेले पदार्थ निवडा.