Pune Prime News Desk : भारतीय पदार्थांमध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. प्रत्येक घरात सकाळची सुरुवात साखरेचा चहा किंवा कॉफीने होते. परंतु तुम्हाला माहित आहे का, सतत साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ खाणं आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.
साखरेच्या अधिक प्रमाणात सेवन केल्याने मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. इतकचं नव्हे तर यामुळे दात देखील खराब होऊ शकतात. साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने दात किडन्याची अधिक शक्यता असते. जेव्हा आपण साखरेपासून तयार केलेले पदार्थ खातो तेव्हा तोंडीतील बॅक्टेरिया दातांमध्ये अॅसिड तयार करतात. ज्यामुळे जास्त लवकर किडतात आणि कमकुवत होतात.
साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी प्या. रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा म्हणजे दात किडन्याची समस्या निर्माण होत आहे. केक, चॉकलेट, सॉफ्ट ड्रिंक, चहा, कॉफीचे कमी सेवन करा. साखरेचे सेवन केल्याने तोंडामध्ये बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे तोंडातून दुर्गंधी देखील येऊ शकते. त्यामुळे गोड खाल्ल्यानंतर दात स्वच्छ धुवावे. सतत गोड पदार्थ खाल्याने दात पिवळे होण्याची शक्यता असते. साखरेचे सेवन मर्यादित ठेवणे योग्य आहे. असे केल्यास इतर काही आजारांतून सुटका मिळू शकते.