सुट्टी म्हटलं की अनेकांचा फिरायला जाण्याचा प्लॅन असतो. पण फिरायला जाताना सर्वात जास्त चिंता असते ती खाण्याची. मात्र, अशी काही ठिकाणं आहेत तिथं गेल्यास खाण्याची चिंता पूर्णपणे दूर होऊ शकते. तेही परवडणाऱ्या दरात. याचीच माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत.
देशाची राजधानी दिल्लीत पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. ऐतिहासिक वास्तूंसोबतच दिल्लीच्या खाद्यपदार्थांचीही एक वेगळी ओळख आहे. ओल्ड दिल्लीच्या गल्ल्यातील प्रसिद्ध चाट असोत किंवा छोले भटुरे आणि पराठे असोत. यासोबतच दिल्लीचे बटर चिकनही खूप प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला स्ट्रीट फूड खाण्याची आवड असेल तर विचार न करता मुंबईला भेट द्या. अगदी कमी पैसे खर्च करून तुम्ही वडा पाव, पावभाजी, भेळ पुरी आणि पाणीपुरी यांसारख्या गोष्टी रस्त्यावरच खाऊ शकता. हे स्ट्रीट फूड तुम्हाला खूप आवडू शकेल.
जेवणाच्या बाबतीत लखनौ चांगले सरस ठरू शकते. लखनौचे नाव येताच कबाब आणि बिर्याणीचे विचार मनात येतात. कबाब आणि बिर्याणीसोबतच इथे मिळणारा व्हेज कबाब पराठाही तुम्हाला आवडू शकेल. तसेच जर तुम्हाला मिठाई आवडत असेल तर एकदा कोलकात्याला जाण्याचा बेत नक्की करा.