पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या मुलांचा सांभाळ करत असताना त्यांना चांगल्या गोष्टी कशा सांगता येतील, असा प्रयत्न सर्वच पालकांचा असतो. त्यामुळे विशेष लक्षही दिले जाते. तुमच्या मुलांचे अभ्यासाचे निरीक्षण करा. शैक्षणिक कौशल्यांमध्ये त्याची प्रगती चांगली असेल, तर त्याच्या गृहपाठावर लक्ष द्या. मुलाला गती असलेल्या क्षेत्राबद्दलची तुमची माहिती आणि अनुभव त्याच्यासोबत शेअर करा. त्याच्या चांगल्या गुणांचे कौतुक करा. तसेच गरज वाटल्यास सल्लाही द्या.
कष्ट, जिद्द ठेवली तर आपल्यातील गुणांचे सोने होते, हे शिकवा. कौशल्ये विकसित करण्यास आपल्याला मुलाला वेळ द्या. मुलाला चांगल्यातली चांगली कामगिरी करता यावी, यासाठी त्याच्या पातळीनुसार आव्हानेही द्या. चांगल्या गुणांनी लहान मुलांची वाढ होत असते. मात्र, पालकत्वासाठी ते एक प्रकारचे आव्हानही असते. मुलांवर वरचढ न होता, त्यांच्यातील गुणांची वाढ करण्यासाठी त्यांना मदत करणे, हे पालकांचे महत्त्वाचे काम आहे.
मुलाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रातला इंटरेस्ट, तसेच प्रेरणेची पातळी वाढण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी जमवू द्या. मुलाच्या आवडीच्या क्षेत्रातील पुस्तके, नियतकालिके, व्हिडिओ त्याच्यासाठी खरेदी करू शकता. मुलाला त्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी पुरेशी मोकळीक द्या. त्याचे काम करण्यासाठी प्रायव्हसी मिळावी, याकडेही लक्ष द्या. असे केल्यास तुमच्या मुलांमध्ये नक्कीच सकारात्मक बदल जाणवू शकेल.