ज्याप्रमाणे सकाळी आपला मूड चांगला राहिल्यास दिवसही चांगला जातो, त्याचप्रमाणे सकाळी जर आपण आपल्या त्वचेची चांगली काळजी घेतली तर आपली त्वचा दिवसभर प्रदूषण आणि धुळीपासून सुरक्षित राहते. दिवसभर चमकणारी त्वचा ठेवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
सकाळी सर्वात आधी फेस क्लिन्जर वापरा. यासाठी हलक्या क्लिंजरने चेहरा धुवा. हे त्वचेवर रात्रभर साचलेले तेल, घाण आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. चेहरा व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला योग्य टोनर वापरावा लागेल. हे तुमच्या त्वचेची पीएच पातळी संतुलित करते आणि छिद्र साफ करते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही टोनरऐवजी गुलाबजल वापरू शकता.
प्रत्येकाने चेहऱ्यावर सीरम वापरणे आवश्यक आहे. हे त्वचेला खोलवर पोषण देण्याचे काम करते. वयानुसार तुम्हाला त्वचेची समस्या उद्भवू शकते. तेव्हा व्हिटॅमिन सी असलेले अँटिऑक्सिडंट सीरम वापरा. त्यामुळे त्वचेला चमक येते. तसेच त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी मॉइश्चरायझर वापरणे गरजेचे असते. फक्त तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर निवडा.