नागपूर : नागपूरमध्ये धावत्या ट्रेनमध्ये तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमध्ये ही घटना घडली.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद-नवी दिल्ली दक्षिण एक्स्प्रेसमध्ये तरुणाची हत्या करण्यात आली आहे. एका तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. धावत्या ट्रेनमध्ये ही घटना घडल्यामुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. मोबाईल चोरीचा कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गुरुवारी मध्यरात्री साडेतीन वाजताचा सुमारास दिल्लीकडे जाणाऱ्या धावत्या ट्रेनमध्ये वाद झाला. या वादातून चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. दक्षिण एक्सप्रेसच्या जनरल बोगीमध्ये ही घटना घडली. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला. नागपूर लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम रेल्वे स्थानकाजवळ या युवकांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे. मात्र, ही गाडी सेवाग्राम रेल्वे स्थानकावर थांबत नसल्याने नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानक येईपर्यंत या युवकाचा मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. दक्षिण एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर पोहोचताच पोलीस व वैद्यकीय पथकाने त्या तरुणाला खाली उतरवून तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.