शिक्रापूर : एका भाडेकरु तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ढोकसांगवी (ता. शिरुर) येथे घडली. कृष्णा ज्ञानेश्वर माने (वय २५ रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. रेल्वे पूल जवळ परभणी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत तात्याबा रावसाहेब पाचंगे (वय ४२ रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली.
तात्याबा पाचंगे यांच्या खोलीमध्ये कृष्णा हा भाडेकरू म्हणून राहत होता. त्याने दिवसभरात दरवाजा उघडला नसल्याने तात्याबा यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असता त्यांना कृष्णा याने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी याबाबतची माहिती रांजणगाव पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कृष्णाला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी कृष्णाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपास पोलीस करत आहेत..